शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महविश फातीमा साकीब शाह (वय २१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी साकीब शाह शाह मंजुर शाह, मंजुर शाह हैदर शाह, वहीदा बी मंजुर शाह, नगम्मा परवीन असलम शाह, वशीम शाह मंजुर शाह, सीमा बी आमिद शाह आणि आमिद शाह यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, नागपूर येथील खरबी रोड सहकार नगर परिसरातील टिकले लेआऊट येथे २१ एप्रिल २०२४ ते १७ डिसेंबर २०२५ या कालावधीत ही घटना घडली. आरोपींनी माहेरहून १२ लाख रुपये हुंडा म्हणून आणण्याची मागणी करत वारंवार वाद घातले. तसेच फिर्यादीला शिवीगाळ, मारहाण करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय विवाहितेला शारीरिक तसेच मानसिक त्रास देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कायमी गुन्हा क्रमांक ३२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.














