अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; परराज्यातील तरुण अटकेत….

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज):
बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी झारखंड राज्यातील पलामू जिल्ह्यातील अंम्बाबार येथील संतोष ब्रिजपाल भुझ्या (वय २५) याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.


बुधवारी (दि. २८) दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान ही घटना घडली. पीडितेचे पालक कामानिमित्त घराबाहेर असताना आरोपीने पीडिता एकटी असल्याचा फायदा घेत जबरदस्तीने तिला खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.


या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून भारतीय न्याय संहिता व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!