Advertisement Advertisement

भीषण अपघात! मेहकर–डोणगाव रस्त्यावर काळरात्र! कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच बळी….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर–डोणगाव मार्गावर नागापूर फाट्याजवळील पुलाजवळ कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना परिसरात मोठी हळहळ निर्माण करणारी ठरली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोणगाव येथील शेख साकिब कुरेशी आणि शेख साहिल हे दोघे तरुण दुचाकीने मेहकरकडून डोणगावकडे आपल्या घरी परतत होते. दरम्यान, नागापूर फाट्याजवळील पुलाच्या परिसरात समोरून येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोन्ही मृतदेह पुढील कार्यवाही व शवविच्छेदनासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी मेहकर ग्रामीण रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. आपल्या कुटुंबासाठी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या दोन्ही तरुणांचा अशा पद्धतीने अचानक मृत्यू झाल्याने डोणगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.या अपघाताबाबत पुढील पोलिस कार्यवाही सुरू असून, अपघात नेमका कसा घडला याचा तपास केला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!