Advertisement Advertisement

वरखेडची २३ वर्षाची दिपाली घरातून कुणालाच न सांगता निघून गेली; नातेवाईकांसह पोलिसांची शोधाशोध सुरू….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मलकापूर तालुक्यातील वरखेड येथील २३ वर्षीय युवती घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

संजय श्रीराम माल्टे, रा. वरखेड, ता. मलकापूर यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दिपाली संजय माल्टे (वय २३) ही घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली.

दिपाली घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा नातेवाईक तसेच इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र, शोध घेऊनही ती कुठेही आढळून आली नाही. अखेर याबाबत मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मिसिंग क्र. २१/२०२६ नुसार नोंद केली असून, युवतीचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिपालीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!