Advertisement Advertisement

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; प्रेमास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी, पोक्सोअंतर्गत गुन्हा…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा वारंवार छळ करणाऱ्या युवकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने मुलीला प्रेमाचा प्रस्ताव देत नकार दिल्यास पळवून नेण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे मुलगी व तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी काही नागरिक आणि मुलीचे काका आरोपीकडे गेले असता त्याने वाद घालत थेट ऑटोरिक्षा त्यांच्या अंगावर घातल्याचा आरोप आहे. या धडकेत संबंधित व्यक्ती खाली पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आरोपीच्या या आक्रमक वर्तणुकीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तोंडी फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!