Advertisement Advertisement

लहान मुलांच्या वादातून दगडफेक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल! खामगावच्या बर्डी प्लॉट परिसरातील घटना; एक जखमी, मुलीलाही मार…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज)खामगाव शहरातील बर्डी प्लॉट परिसरात लहान मुलांमधील किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊन दगडफेकीची घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीच्या डोक्याला दुखापत झाली असून एका दहा वर्षीय मुलीच्या हातालाही मार लागला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्डी प्लॉट परिसरातील रहिवासी जुबेर जमीर शेख यांच्या घराशेजारी बुधवारी (दि. …) सायंकाळी लहान मुलांमध्ये किरकोळ वाद झाला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा वाद मिटविला होता. मात्र, रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास रफिक शेख, आरिफ शेख आणि सिद्दीक शेख हे तिघे घटनास्थळी आले. त्यांनी जुबेर शेख यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

यानंतर संबंधितांनी संतापाच्या भरात घरावर तसेच फिर्यादीवर दगडफेक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या दगडफेकीत सय्यद युनूस सय्यद गनी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. तसेच घटनास्थळी असलेल्या एका दहा वर्षीय मुलीच्या हातालाही मार लागला. याशिवाय घरासमोर उभी असलेल्या मोटारसायकलीचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रफिक शेख, आरिफ शेख आणि सिद्दीक शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विजय उभे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!