Advertisement Advertisement

“दारूसाठी पैसे न दिल्याचा राग; तरुणावर चाकूने हल्ला, खामगावात एक जखमी…

खामगाव (बुलढाणा कव्हरेज न्युज):दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यानंतर नकार मिळाल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना खामगाव शहरातील घाटपुरी नाका परिसरात घडली. या प्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय भगवान किरकाले (वय ३५, रा. घाटपुरी नाका, खामगाव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून अनिरुद्ध भास्कर चंडाळ (रा. जोशीनगर, खामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही घटना २८ जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी अजय किरकाले हे आपल्या मित्रांसोबत घाटपुरी नाका परिसरात उभे असताना आरोपी तेथे आला. त्याने दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याचे सांगितल्याने आरोपी संतापला. त्याने शिवीगाळ करत हातातील चाकूने अजय किरकाले यांच्या डाव्या हाताच्या बोटावर वार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले.

घटनेनंतर जखमीवर उपचार करण्यात आले असून, त्यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!