Advertisement Advertisement

घरासमोर येऊन महिलेला अश्लील शिवीगाळ; जिवे मारण्याची धमकी, एकाविरुद्ध गुन्हा….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शिरसोडी (ता. नांदुरा) येथील ४० वर्षीय महिलेला घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवकाबाई देविदास भोंडेकर (वय ४०, रा. शिरसोडी, ता. नांदुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २२ जून रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी संतोष अशोक खापरे (रा. शिरसोडी) हा त्यांच्या घरासमोर आला. त्याने फिर्यादीस अश्लील शिवीगाळ केली तसेच, “तुझा मुलगा माझ्या पत्नीच्या नावावरील मोटारसायकल का चालवतो?” असा जाब विचारला.

यावेळी फिर्यादींनी मुलगा घरी आल्यानंतर त्याला समजावून सांगू, असे सांगितले. मात्र आरोपीने त्यानंतरही शिवीगाळ सुरू ठेवत फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून संतोष अशोक खापरे याच्याविरुद्ध अप. क्र. १२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३३, २९६, ३५२, ३५१(२) व ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ जाधव करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!