Advertisement Advertisement

“उसनं दिलेलं ४० हजार मागायला गेला… अन् दगडानं फोडलं डोकंच! गिरोली बुद्रुकमध्ये पैशांच्या वादातून पाच जणांवर गुन्हा”…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): उसने दिलेले ४० हजार रुपये परत मागणे एका शेतकऱ्याला चांगलेच महागात पडले. पैशांच्या वादातून दगडाने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, याच घटनेप्रकरणी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याने प्रकरण अधिकच गाजत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरोली बु. येथील रहिवासी अनिल साहेबराव चव्हाण (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल अशोक कुसळकर, संतोष रामदास पिटकर, गणेश रामदास पिटकर, राहुल शिवाजी शिंदे आणि आरती राहुल कुसळकर (सर्व रा. गिरोली बु.) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१८ जून रोजी दुपारी सुमारे २ वाजता अनिल चव्हाण हे राहुल कुसळकर याच्या घरी उसने दिलेले ४० हजार रुपये परत मागण्यासाठी गेले होते. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ केली. त्यानंतर धक्काबुक्की करत जवळ पडलेला दगड डोक्यात मारल्याने अनिल चव्हाण जखमी झाले. यानंतर इतर आरोपीही घटनास्थळी येऊन त्यांनी चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीची पत्नी पूजा चव्हाण व वहिनी शीतल मुधोळकर या मध्ये पडल्या असता, आरोपी आरती कुसळकर हिने त्यांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायम अप. क्र. २७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १८९(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ संजय गोरे करीत आहेत.

दरम्यान, याच घटनेत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने पोलिसांकडून सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!