Advertisement Advertisement

धोत्राभणगोजी येथे घराला भीषण आग; ९० हजारांचे साहित्य जळून खाक

धोत्रा भणगोजी (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथील शिवशंकर पुंडलीक वाळके यांच्या घराला १६ जून रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने गावकऱ्यांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. वाळके कुटुंबीयांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले आणि अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत घरातील मोठ्या प्रमाणात साहित्य आगीत जळून खाक झाले.

या आगीत ३ पोते गहू (६ हजार रुपये), विद्युत मीटर (५ हजार), कुलर (६ हजार), पाण्याच्या टाक्या (१० हजार), कपडे व इतर साहित्य (१२ हजार), पलंग (५ हजार), टिनपत्रे (१० हजार), भांडी (१२ हजार) तसेच ६ पोते सोयाबीन (३० हजार रुपये) असे एकूण सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेनंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी बळीराम काळे, प्रल्हाद शेडगे, शिवशंकर वाळके, रमेश शेळके, अशोक काळे आणि रामेश्वर काळे उपस्थित होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!