Advertisement Advertisement

BIG BREKING रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा वणवा भडकला! खामगावात “एसडीओ” कार्यालय जाळण्याचा प्रयत्न! पेठच्या पुलावर संतप्त शेतकऱ्यांनी टायर जाळले…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा आता चांगलाच भडकला आहे. ठीक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून फसव्या कर्जमाफीचा जीआर जाळत आहेत. काही ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. रात्री किनगाव जट्टू येथे बस पेटवल्याची घटना ताजी असताना आता खामगाव येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर येत आहे. मध्यरात्री २ ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात आंदोलकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला.

शेतकरी नेते रविकांत तुपकर १५ जूनपासून त्यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी कर्जमुक्तीसाठी अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. विविध स्थरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. दरम्यान आता आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्याचे चित्र आहे. काल, दिवसभरात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी शासनाची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत जीआर जाळले. रात्री किनगाव जट्टू येथे देखील एसटी बस पेटल्याचा प्रकार समोर आला, मात्र पोलिसांकडून बस शॉर्टसर्किटने पेटल्याचा दावा केला जात असला तरी संतप्त शेतकरी आंदोलकांनीच बस पेटवल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान रात्री खामगाव येथील एसडीओ कार्यालय पेटवण्याचा अज्ञात आंदोलकांनी प्रयत्न केला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे असे फलक झळकावून कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती हाती आली आहे. दुसरीकडे चिखली खामगाव रस्त्यावरील पेठ येथील पुलावर रात्रीच्या सुमारास संतप्त शेतकरी आंदोलकांनी भर रस्त्यावर टायर पेटवून दिल्याची माहिती मिळत आहे. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस! रविकांत तुपकरांकडून शांततेचे आवाहन..

रविकांत तुपकर यांच्या अन्न त्याग आंदोलनाचा आज ,१७ जूनला तिसरा दिवस आहे. आंदोलनाला विविध स्तरांतून मिळत असलेले जनसमर्थन पाहता आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्याचे संकेत मिळत आहेत. रविकांत तुपकर यांनी अन्नाचा कणही घेतलेला नाही,त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत जात आहे. ठिकठिकाणी हिंसक घटना समोर येत असताना रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना शांततेने आणि संयमाने भावना व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!