Advertisement Advertisement

महिनाभरात २४ लग्नं थांबवली; अल्पवयीन लेकरांच्या गळ्यातलं मंगळसूत्र अडवलं! प्रशासनाची मोठी कारवाई…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवित गेल्या एका महिन्यात तब्बल २४ बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. चाईल्ड हेल्पलाईन आणि बाल संरक्षण कक्षाच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप केला. समुपदेशन, पालकांशी चर्चा आणि कायदेशीर कारवाईचा इशारा देत हे विवाह थांबविण्यात आले.

तालुकानिहाय रोखण्यात आलेल्या बालविवाहांची संख्या पुढीलप्रमाणे आहे – सिंदखेड राजा ४, मेहकर ४, लोणार ३, मोताळा २, बुलढाणा २, मलकापूर २, खामगाव २ तसेच इतर तालुक्यांतही कारवाई करण्यात आली.

बालविवाह रोखण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, चाईल्ड हेल्पलाईन १०९८, पोलीस प्रशासन, बाल संरक्षण कक्ष आणि स्वयंसेवी संस्थांनी संयुक्तरीत्या काम केले. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून अल्पवयीन मुलामुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि भविष्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

बालविवाहाबाबत कुठेही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!