Advertisement Advertisement

माझ्यासोबत ये, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन! स्नॅपचॅट अकाउंटच्या माध्यमातून धमक्या….

मलकापूर(बुलडाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावरील स्नॅपचॅट अकाउंटच्या माध्यमातून धमक्या देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार मलकापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे १९ वर्षीय युवकाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या गाव परिसरातील अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीत आरोपी युवराज भातुरकर (रा. लखानी चौक, मलकापूर) याने स्नॅपचॅटवरून संपर्क साधत धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. “माझ्यासोबत ये, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन तसेच तुझ्या कुटुंबीयांना इजा पोहोचवीन,” अशा प्रकारच्या धमक्या आरोपीकडून देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, डिसेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत आरोपीने वारंवार धमकावून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देत मानसिक दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!