शेगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरात १७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा हात पकडत लग्नासाठी दबाव टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पलश संजय देशमुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी १५ मे रोजी सायंकाळी क्लास करून घरी परतत असताना नायरा पेट्रोलपंप परिसरात आरोपीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर तिला अडवून “तू मला आवडते, माझ्यासोबत लग्न कर” असे म्हणत जबरदस्तीने संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थिनीने विरोध करत हात झटकला असता आरोपीने तिला व तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर पीडितेने कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.














