Advertisement Advertisement

अफू लावून पैसे कमवायचादोन शेतकऱ्याचा डाव फसला! मेहकर तालुक्यातील पांग्री काटे शिवारात ….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील पांग्री काटे शिवारात दोन शेतकऱ्यांनी चक्क अफूचं पीक लावल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या धाडीमध्ये उघडकीस आला. पोलिसांनी धाड टाकून तब्बल १ कोटी ३२ लाख ९ हजार ४०० रुपयांची अफूची झाडं आणि बोंडे जप्त केली.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आरोपी भागवत सदाशीव काटे आणि विशाल रमेश काटे यांनी आपल्या शेतात गुपचूप अफूची लागवड केली होती.

सोमवारी रात्री खाडे साहेब आपल्या पथकासह गस्त घालत असताना पांग्री काटे शिवारात अफूचं पीक असल्याची खबर मिळाली. लगेच पोलिसांनी गट नं. १४८ आणि १२८ मध्ये धाड टाकली. तिथं तपास केला असता अफूची झाडं, बोंडे, फुलं आणि पानं मोठ्या प्रमाणात आढळून आली.

भागवत काटे याच्या शेतातून १०७ किलो ६६० ग्रॅम (८६ लाख १२ हजार ८०० रुपये किंमत) तर विशाल काटे याच्या शेतातून ५७ किलो ३२० ग्रॅम (४५ लाख ८५ हजार ६०० रुपये किंमत) असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश कड यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस ठाणे येथे दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नीलेश तांबे आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या धाडीत पोलीस, महसूल, फॉरेन्सिक, अंमली पदार्थ शोधक पथक आणि श्वान पथकानेही मोठी मदत केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!