Advertisement Advertisement

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; सरंबा येथील युवकाचा दुर्दैवी अंत…! देऊळगाव राजा रोडवर काळाचा घाला; एक गंभीर जखमी…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव राजा रोडवरील मीरा लॉन्ससमोर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन सरंबा येथील एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना ५ फेब्रुवारी रोजी रात्री घडली.

मृतक युवकाचे नाव स्वप्निल दिनकर चेके (वय २७, रा. सरंबा) असे आहे. स्वप्निल हा आपला मित्र शंकर प्रसाद याच्यासह एमएच २८ बीएम ५८७० क्रमांकाच्या दुचाकीवरून सरंबा गावाकडे जात होता. दरम्यान, मीरा लॉन्ससमोर समोरून येणाऱ्या एमएच २८ झेड ८४३६ क्रमांकाच्या दुचाकीच्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत स्वप्निलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात स्वप्निल चेके गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातातील आरोपी दुचाकी चालक देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेप्रकरणी संतोष मधुकर पडघान (वय ४०, रा. भालगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!