मलकापूर हादरलं…! १२ वर्षांच्या चिमुकलीवर नराधमाची वारंवार घाणेरडी कृत्ये…! शिवाजी नगर मधील २५ वर्षीय तरुण पोलीस ताब्यात; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मलकापूर शहरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जामनेर येथील १२ वर्षीय मुलगी मलकापूर येथे नातेवाईकांकडे राहत असताना, शिवाजीनगर येथील रोहित दिपके (वय २५) याने तिच्यावर वेळोवेळी जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

पीडित मुलीच्या आईने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, १ जानेवारी रोजी सकाळी घरात कोणी नसताना आरोपीने मुलीशी गैरवर्तन केले. यानंतर कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत १५ व २३ जानेवारी रोजी पुन्हा त्याच प्रकारची कृत्ये केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२/२०२६ अंतर्गत बीएनएस कलम ६४(२)(M), ६५(१), ३५२ तसेच पोक्सो कायदा कलम ४, ६, ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!