चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखलीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराला मोठा वेग आला असून, शहरात एक भावना जोरदार उमटताना दिसत आहे..काशिनाथ आप्पा बोंद्रे नगराध्यक्ष झाले म्हणजे चिखलीकरांपैकीच एक नगराध्यक्षपदी बसणार!काशिनाथ आप्पा यांच्या साधेपणामुळे, लोकाभिमुख कार्यशैलीमुळे आणि समस्यांकडे स्वतःच्या घरच्या अडचणीसारखे पाहण्याच्या वृत्तीमुळे नागरिक त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवू लागले आहेत. कोणतीही अडचण असो, मदतीला लगेच धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव लोकांना जवळचा वाटतो.प्रचारसभांमध्ये, कॉर्नर मीटिंगमध्ये आणि दैनंदिन संवादात नागरिक सहजपणे म्हणत आहेत की,“आप्पा जिंकले म्हणजे आपणच जिंकलो!”तरुण, महिला, ज्येष्ठ, व्यावसायिक..शहरातील सर्व स्तरांतील लोक या भावनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे जनमानसाचा कल कोणत्या दिशेने आहे हे स्पष्ट दिसू लागले आहे.महाविकास आघाडीच्या प्रचारात वाढणारी गर्दी, अपक्ष उमेदवारांचे समर्थन, आणि लोकांचा उत्साह बघता शहरात एकच आवाज ऐकू येतो आहे.“चिखलीचे भवितव्य घडवायचे असेल, तर नगराध्यक्ष म्हणून काशिनाथ आप्पा बोंद्रेच हवे!”
चिखलीकरांचा विश्वास दृढ : “काशिनाथ आप्पा नगराध्यक्ष म्हणजे आपण सर्व नगराध्यक्ष!”













