बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :१६ वर्षीय मुलगी आणि २० वर्षीय प्रियकर तब्बल तीन महिने पोलिसांना चकवून राहत होते. मात्र मुलीने नकळत फेसबुकवर मैत्रिणीची पोस्ट लाईक केल्याने पोलिसांना त्यांचा पत्ता लागला आणि अखेर रविवारी (२४ ऑगस्ट) पोलिसांनी दोघांना रांजणगाव शेणपुंजी येथून ताब्यात घेतले.
Babydoll Archi की सच्ची कहानी, उम्र, वायरल वीडियो और गहरा विवाद जो सबको चौंका देगा
बुलडाण्यातील ही मुलगी आणि प्रियकर पृथ्वीराज अवसरमोल (वय २०) यांचे प्रेमप्रकरण घरच्यांना समजले होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिला छत्रपती संभाजीनगरला बहिणीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र १५ मे रोजी ती बसस्थानकावर पोहोचताच प्रियकरासोबत पलायन करून रांजणगाव शेणपुंजी येथे राहू लागली. त्यानंतर दोघांनी मोबाईल बंद केले, एटीएम वापरणे थांबवले आणि अगदी घरच्यांशीही संपर्क तोडला. यामुळे कुटुंबीयांबरोबर पोलिसही चिंतेत होते.
शेत मोजणीसाठी भरती! भूमिअभिलेख विभागात मोठी भरती; 700 पदांच्या भरतीसाठी शासनाची मान्यता
दरम्यान, मुलीने दोन आठवड्यांपूर्वी फेसबुकवर मैत्रिणीची पोस्ट लाईक केली. त्यावरून पोलिसांनी तांत्रिक तपास करून मोबाइल क्रमांक शोधला आणि त्याचे लोकेशन रांजणगाव शेणपुंजी दाखवले. शिवाय त्याच क्रमांकावरून गॅस कनेक्शनसाठी अर्ज केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गॅस एजन्सीमार्फत संपर्क साधत केवायसीच्या निमित्ताने घराचा पत्ता मिळवला.
यानंतर पोलीस उपनिरीक्षक सतीश जोगस यांच्या पथकाने गॅस कर्मचाऱ्यांच्या वेशात जाऊन तपास केला आणि अखेर युगुलासह घर गाठले. दोघेही तेथे मिळून आले.
पोलिसांनी प्रियकर पृथ्वीराजला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या दोघांनी विवाहासाठी अनेक संस्थांकडे धाव घेतली होती, परंतु मुलीचे वय कमी असल्याने सर्वांनी नकार दिल्याचे समजते.














