Advertisement Advertisement

दारू प्यायला पैसे मागितले, नकार मिळताच दगड उचलला आणि लगेच….! आरेगावात नातेवाईकाचा संताप अन् मारहाण!; डोणगाव पोलिसांत गुन्हा दाखल

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या नातेवाईकाने दगडाने हल्ला करून एका व्यक्तीला जखमी केल्याची घटना मेहकर तालुक्यातील आरेगाव येथे घडली. याप्रकरणी डोणगाव पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर वसंता बदर (वय ४७, रा. आरेगाव, ता. मेहकर) हे ११ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या चुलत भावाकडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान, रस्त्यात त्यांचे नातेवाईक दीपक मुरलीधर बदर (रा. जांभरून नावजी, ता. जि. वाशिम) याने त्यांना अडवून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.

मात्र, परमेश्वर बदर यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर दगडाने त्यांच्या डाव्या डोळ्याजवळ मारून जखमी केले. यावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेत जखमी झालेल्या परमेश्वर बदर यांनी उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यावर २२ नोव्हेंबर रोजी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक मुरलीधर बदर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!