Advertisement Advertisement

आई स्वयंपाकात घरात गुंतली, इकडं १६ वर्षांची पोरगी घरासमोर रांगोळी काढता काढता गायब! तरुणावर  फूस लावून पळविल्याचा संशय!

कारंजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील वाल्मिकी नगर परिसरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अभय डेंडूळे (रा. वाल्मिकी नगर, कारंजा) याच्याविरुद्ध कारंजा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची १६ वर्षीय मुलगी ८ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास घरासमोर रांगोळी काढत होती. त्यावेळी तिची आई स्वयंपाकघरात काम करीत होती. काही वेळाने आई बाहेर आली असता मुलगी घरासमोर दिसून आली नाही. अचानक मुलगी गायब झाल्याचे लक्षात येताच आई-वडिलांनी परिसरासह नातेवाइकांकडे तिचा शोध घेतला. मात्र, बराच शोध घेऊनही मुलगी कुठेच मिळून आली नाही.

दरम्यान, मुलीच्या आईने अभय डेंडूळे याने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही संबंधित मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी याच आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने वाल्मिकी नगर परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार संजय गोडसे करीत आहेत. बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासह घटनेमागील सर्व बाबींची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!