Advertisement Advertisement

दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याच्या दारात वसुली अधिकारी !रविकांत तुपकरांनी अधिकाऱ्याला जागेवरच धुतलं!ग्रामीण कुटा फायनान्स च्या वरिष्ठ अधिकाऱ्याचेही फोनवरून उपटले कान!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) अरे, माणुसकी आहे की संपली? ऐन दिवाळीच्या दिवशी… घराघरात लक्ष्मीचं पूजन चाललंय, पोरांना घालायला कपडे नाहीत , अशा ऐन दिवाळी दिवशी तुम्ही वसुलीसाठी शेतकऱ्याच्या घरात जाऊन ठिय्या मांडून बसता? लाजा वाटू द्या जरा, असे ठणकावत रविकांत तुपकर यांनी वसुली अधिकाऱ्याला गावातून हाकलून लावले तर त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावून चांगलेच धुतले…!

पान्हेरा गावात ग्रामीण कुटा या खाजगी फायनान्स च्या वसुली अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या दिवशीच शेतकऱ्याच्या घरात घुसून तगादा लावला. “पैसे दिल्याशिवाय इथून उठणार नाही” अशी मुजोरी केली.
योगायोगाने त्याच परिसरात असलेले क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांना ही माहिती मिळताच ते थेट घटनास्थळी धडकले. दरम्यान वसुली अधिकाऱ्याला
तुपकरांनी कडक सवाल केले.


‘दिवाळीच्या दिवशी लोकांच्या घरी माणसं पाठवता? लाजा वाटू द्या जरा! तुमच्यात मानवता शिल्लक आहे की नाही?’
“शेतकरी मरतोय, दुष्काळात पिकं गेली, हातात पैसा नाही… आणि तुम्ही दिवाळीला दारात ठाण मांडून बसता? हा माज कुठून आला?’ असे खडेबोल सुनावत वसुली अधिकाऱ्याला गावातून हाकलून लावले.
दरम्यान फक्त तिथल्या कर्मचाऱ्याला नाही, तर थेट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे फोन लावून तुपकरांनी कान उपटले व संबंधित शेतकरी व शेतमजूरांच्या कुटुंबाला धीर दिला.

तुपकरांचा सरकारला थेट इशारा..

दुष्काळ आहे, शेतकरी- शेतमजूर अडचणीत आहे. या वर्षाचं खासगी फायनान्स आणि मायक्रोफायनान्सचं संपूर्ण व्याज माफ करा, शेतकऱ्यांचा CIBIL स्कोअर खराब करू नका! RBI सोबत बोलून तातडीने मार्ग काढा व तसा दिलासा देणारा शासन निर्णय काढा. अशी मागणी यावेळी रविकांत तुपकरांनी केली.


दिवाळीत शेतकरी मजुरांच्या घरात आनंदाऐवजी वसुलीचा तगादा लावणाऱ्यांनी वेळीच सावध व्हा! नाहीतर आंदोलनाचा वणवा पेटेल, आणि तो विझवणं कुणालाच जमणार नाही,असा कडक इशारा तुपकर यांनी यावेळी दिला.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!