Advertisement Advertisement

मावशीसोबत जात होती, मध्येच हाताला झटका देऊन निघाली! दाताळ्याची १९ वर्षांची दुर्गा बेपत्ता; अपहरणाचा संशय, पोलिसांत गुन्हा दाखल!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील मौजे दाताळा येथून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. दुर्गा विनोद बुले (वय १९, रा. दाताळा) ही ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आपल्या मावशीसोबत जात असताना अचानक हाताला झटका देऊन निघून गेली. त्यानंतर तिचा नातेवाइकांनी परिसरात शोध घेतला; मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दुर्गा हिचे मामा गजानन प्रल्हाद कुले यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, तरुणीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर असून, या घटनेमुळे दाताळा परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. तरुणीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!