Advertisement Advertisement

चिखली-जालना महामार्गावर मृत्यूचा खेळ!बेराळा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात; एका व्यक्तीचा जागीच जीव गेला!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली-जालना महामार्गावर बेराळा फाट्याजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात चिखली येथील ४७ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विनोद तुकाराम कऱ्हाडे (वय ४७, रा. रामानंद नगर, चिखली) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेने रामानंद नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कऱ्हाडे हे दुचाकीने चिखली-जालना महामार्गावरून चिखलीच्या दिशेने येत होते. दरम्यान, बेराळा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कसा घडला, दुचाकीची धडक कशाला बसली किंवा अन्य कोणत्या कारणामुळे हा अपघात झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

या अपघातात विनोद कन्हाडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. दरम्यान, भर महामार्गावर झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम चिखली पोलीस करीत असून, पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!