Advertisement Advertisement

वाद जुना, पण राग काही कमी होईना!गीतांजली टॉकीजजवळ सलमानला गाठलं!उजव्या हातावर चाकूने वार; युवक जखमी!देऊळगाव राजात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील गीतांजली टॉकीज परिसरात जुन्या वादातून एका २७ वर्षीय युवकावर चाकूने हल्ला केल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेख सलमान शेख जहीर (रा. रहमतनगर) हा युवक जखमी झाला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान हा गीतांजली टॉकीजजवळ उभा असताना आयुष सुरेश जाधव (रा. शिवाजीनगर), रोहित कासारे (रा. रहमतनगर) आणि त्यांच्यासोबत असलेला एक अनोळखी व्यक्ती तेथे आले.

यावेळी आयुष जाधव याने सलमानच्या उजव्या हातावर चाकूने वार करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात सलमान जखमी झाला.

या प्रकरणी शेख सलमान यांच्या तक्रारीवरून आयुष जाधव, रोहित कासारे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या वादातून घडलेल्या या चाकूहल्ल्याच्या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!