Advertisement Advertisement

घर बांधायचं म्हटलं की शेजाऱ्यांचा पोटशूळ! फोटो-व्हिडिओ काढण्यावरून राडा!! महिलेला अश्लील शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घराचं बांधकाम सुरू असताना जागेच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली! घराच्या बांधकामावरून सुरू असलेल्या वादातून एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना खामगाव शहरातील वाडी परिसरात १८ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या प्रकरणी महिलेने खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शेजारील व्यक्तीसह त्याच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आपल्या पतीसह खामगाव येथील वाडी परिसरात राहतात. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, जागेच्या कारणावरून शेजाऱ्यांसोबत वाद सुरू आहे. हा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

१८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या घराच्या बांधकामासाठी मजूर आले होते. यावेळी बांधकामाची पाहणी करण्यासाठी महिला घराच्या गच्चीवर गेल्या असता, शेजारी राहणारे गजानन तायडे हे त्यांच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ काढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत महिलेने विचारणा केली असता, संबंधित व्यक्ती आणि त्याच्या दोन मुलांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही महिलेने म्हटले आहे.

या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी गजानन तायडे आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार संतोष गायकवाड करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!