Advertisement Advertisement

उदयनगर-लाखनवाडा मार्गावर भरधाव वाहनाचा कहर! रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक; जागीच मृत्यू….

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज):उदयनगर ते लाखनवाडा मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास डासाळा व टाकरखेड हेलगाजवळ घडली.

चिखली तालुक्यातील उदयनगर येथून लाखनवाडामार्गे बाळापूरकडे जाणारा महामार्ग आहे. या मार्गावरून बिबट्या रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!