Advertisement Advertisement

कामाला निघाले अन् नशिबानं घात केला! निलगाय आडवी आली, अपघात झाला; जखमी मजुराचा अखेर मृत्यू….

पांगरी काटे (बुलडाणा कव्हरेज न्युज): गुंज येथील ग्रामपंचायत विहिरीवर कामासाठी जात असताना रस्त्यावर अचानक निलगाय (रोही) आडवी आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाजी धोंडूंबा तुपकर (वय ५९) असे मृतकाचे नाव असून, २५ सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुंज ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील कर्मचारी आणि शिवाजी तुपकर हे दोघे १८ ऑगस्ट रोजी सकाळी शेलगाव काकडेजवळील कोराडी धरण क्षेत्रातील विहिरीवर नादुरुस्त मोटार पंप काढण्यासाठी दुचाकीवरून जात होते. गुंज ते शेलगाव काकडे मार्गावरून जात असताना अचानक निलगाय (रोही) रस्त्यावर आडवी धावत आली. त्यामुळे दुचाकीचा अपघात होऊन दोघेही गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर दोन्ही जखमींना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर शिवाजी तुपकर यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच २५ सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले.

शिवाजी तुपकर यांच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. २५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात कुटुंबीय व आप्तेष्ट असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!