Advertisement Advertisement

चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरचं ऑईल काढलं अन् लाखोंचा फटका दिला; रामा रिसॉर्टमध्ये चोरीचा धुमाकूळ!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरातील MIDC परिसरात असलेल्या रामा ट्रॅक्टर्सच्या मालकीच्या रामा रिसॉर्ट, प्लॉट क्र. P-43 येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून अंदाजे ४०० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात NCR क्र. 0908/2026, दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीने ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल काढून नेल्याचा संशय आहे. ऑईल चोरी झाल्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले असून, तो जळून नादुरुस्त झाल्याचे रामा ट्रॅक्टर्सकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे केवळ ऑईल चोरीपुरतेच नुकसान न राहता ट्रान्सफॉर्मरच्या नुकसानीमुळेही मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पोलिस नोंदीमध्ये चोरीस गेलेल्या ४०० लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईलची किंमत सुमारे ५० हजार रुपये नमूद करण्यात आली आहे. तर रामा ट्रॅक्टर्सच्या माहितीनुसार, संबंधित ट्रान्सफॉर्मरची अंदाजे किंमत ५ लाख ५० हजार रुपये आहे. त्यामुळे ऑईल चोरी आणि ट्रान्सफॉर्मरच्या नुकसानीमुळे एकूण मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

घटना निदर्शनास आल्यानंतर रामा ट्रॅक्टर्सच्या वतीने चिखली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध CCTV फुटेज तपासावे आणि ऑईल चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच चोरीस गेलेले ट्रान्सफॉर्मर ऑईल आणि नादुरुस्त झालेल्या ट्रान्सफॉर्मरचा शोध घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी रामा ट्रॅक्टर्सच्या वतीने करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!