Advertisement Advertisement

माहेरी निघाली… पण वाटेतच काळाने घात केला!दुचाकी घसरली अन् २८ वर्षीय विवाहितेचा एसटी बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू! शेलसूर फाट्याजवळ हृदयद्रावक अपघात; बहिणीला माहेरी घेऊन येणाऱ्या भावावर दुःखाचा डोंगर…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बहिणीला माहेरी घेऊन येत असताना दुचाकी अचानक घसरल्याने रस्त्यावर पडलेल्या २८ वर्षीय विवाहितेचा समोरून येणाऱ्या एसटी बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी चिखली तालुक्यातील शेलसूर फाट्याजवळ घडली. रेश्मा बी. तौफिक तंबोली (वय २८, रा. जळगाव खानदेश) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, रेश्मा बी. तंबोली यांना त्यांचा भाऊ जळगाव येथून दुचाकीवरून माहेरी घेऊन येत होता. सकाळी सुमारे ११.४० वाजताच्या सुमारास शेलसूर फाट्याजवळ दुचाकी अचानक घसरली. यामुळे रेश्मा बी. रस्त्यावर खाली कोसळल्या.

दुचाकी घसरून त्या रस्त्यावर पडताच त्याचवेळी समोरून एसटी बस येत होती. काही कळायच्या आतच त्या बसच्या पुढील चाकाखाली सापडल्या. बसचे चाक डोक्यावरून गेल्याने रेश्मा बी. यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. क्षणार्धात घडलेल्या या भीषण अपघातामुळे शेलसूर फाट्याच्या परिसरात एकच खळबळ उडाली.

बहिणीला सुखरूप माहेरी घेऊन जाण्यासाठी निघालेल्या भावाच्या डोळ्यांसमोरच हा दुर्दैवी प्रकार घडल्याने त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या घटनेने कुटुंबीयांवरही शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!