Advertisement Advertisement

मलकापूरच्या २३ वर्षीय युवकाचा पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): पुणे येथे एका कंपनीत कार्यरत असलेल्या मलकापूर शहरातील २३ वर्षीय युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेमुळे भोळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील राधाकृष्ण सोसायटी येथील रहिवासी सौनाली रविंद्र भोळे यांचा मुलगा चि. आदित्य रविंद्र भोळे हा पुणे येथे एका कंपनीत कार्यरत होता. १२ ऑगस्ट रोजी त्याच्या छातीत वेदना होत असल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

रुग्णालयात उपचार सुरू असताना आदित्य याला हृदयविकाराचे दोन वेळा तीव्र झटके आले. डॉक्टरांनी उपचारासाठी प्रयत्न केले; मात्र उपचारादरम्यान त्याचे दुःखद निधन झाले.

आदित्यच्या अकाली निधनाची बातमी मलकापूर येथे पोहोचताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली. १३ ऑगस्ट रोजी मलकापूर येथे शोकाकूल वातावरणात आदित्यवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघ्या २३व्या वर्षी त्याचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!