Advertisement Advertisement

बहिणीला मारहाण का केली? जाब विचारताच मेहुण्यावर जीवघेणा हल्ला; साखळी बुद्रुक येथील घटना…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)कौटुंबिक वादातून मेहुण्यावरच लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या साखळी बुद्रुक येथे २१ मार्च रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात ३५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील एकलारा येथील रहिवासी शेख समंदर शेख मुक्तार (वय ३५) यांची बहीण साखळी बुद्रुक येथे सयद अनीस सयद सांडु (वय ४२) यांच्याकडे विवाहाने दिलेली आहे. काही कारणावरून आरोपी सयद अनीस याने पत्नीला मारहाण केल्याची माहिती शेख समंदर यांना मिळाली होती.

याबाबत विचारपूस करण्यासाठी शेख समंदर हे २१ मार्च रोजी दुपारी साखळी बुद्रुक येथे आरोपीच्या घरी गेले. “माझ्या बहिणीला का मारहाण केली?” असा जाब त्यांनी विचारताच आरोपी संतापला. किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले.

रागाच्या भरात आरोपीने घरातील लाकडी काठी उचलून शेख समंदर यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्यावर व हातावर गंभीर दुखापत झाली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने अश्लील शिवीगाळ करत “तुला जीवाने मारून टाकीन” अशी धमकीही दिली.

जखमी अवस्थेत शेख समंदर यांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी सयद अनीस सयद सांडु याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार विकास सोनुने करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!