किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):किनगाव राजा येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी २४ वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली असून आरोपीचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय फिर्यादी मातेने किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान किनगाव राजा येथीलच धनंजय ज्ञानेश्वर मुंढे (वय २४) याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले.
या प्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत असून आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.













