Advertisement Advertisement

दर्शनाला निघाले, पण रस्त्यात काळाने गाठलं; दोन भाविकांचा मृत्यू! बाकी सोळा जण….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर-चिखली मार्गावरील मांद्रा धाडे फाट्याजवळ सैलानी बाबाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाल्याची घटना २९ मार्च रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील भाविक सैलानी बाबाच्या दर्शनासाठी हिवरा आश्रमकडे पिकअप वाहन (क्र. MH-12 GU 7670) ने जात होते. दरम्यान, मांद्रा धाडे फाट्याजवळ वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले व भीषण अपघात झाला.

या अपघातात अरमान शरीफ बागवान (वय १६) व रिहान सैदुल्ला बागवान (वय १०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शहाना बागवान (३५), शबाना बागवान (२५), इफ्तार बागवान (१९), आफिका बागवान (१२), बुशरा बागवान (६), आलिया बागवान (२५), हाफिज बागवान (१५), पाशा मोहम्मद बागवान (७५), मावीश बागवान (९), हिना बागवान (३०), अमोर बागवान (१३), अनस बागवान (१२), अजर बागवान (१०), साहेरा बागवान (६५), शशरीफ बागवान (३५) यांसह एकूण १६ जण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले व अॅम्बुलन्सच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. काही काळ या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

मेहकर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!