Advertisement Advertisement

पोलिस कर्मचाऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपवली जिंदगी..! मेहकर तालुक्यातील घटना…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा मुख्यालयात सेवेत असलेल्या आणि मंत्र्यांच्या स्कॉटींग ड्युटीवर कार्यरत असलेल्या एका ५६ वर्षीय पोलिसाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना ८ मार्च रोजी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब भीमराव शेळके हे पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. ते मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील रहिवासी होते. रविवारी रात्री त्यांनी बाभूळखेड फाट्यानजीक असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविले.

सोमवारी (८ मार्च) सकाळी विहिरीत पुरुषाचे प्रेत आढळून आल्याची माहिती मिळताच गावचे सरपंच शंकर गायकवाड व ग्रामस्थांनी तात्काळ मेहकर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.

मृत पंजाब शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा आप्त परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, अमोल म्हस्के यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!