चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या आहेत, तर काही गावांमध्ये पाणी असूनही पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. “पाणी आहे पण नळाला येत नाही” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बुलडाणा कव्हरेज ने गावकऱ्यांच्या चर्चा नुसार, ग्रामपंचायत कार्यालयाकडून या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. काही ठिकाणी पाणी सोडण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी मस्तीत असून, त्यांना कुणाचंतरी राजकीय पाठबळ असल्याची चर्चा गावागावात रंगली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत आहे.
दरम्यान, वाढत्या टंचाईमुळे गावकऱ्यांचा संताप आता उफाळून येत आहे. “आता पुरे झालं, पाणी मिळालं नाही तर थेट आंदोलन?” असा इशारा ग्रामस्थ देणार आहेत. अनेक गावांमध्ये “हंडा मोर्चा” काढण्याची चर्चा सुरू असून तयारी सुरू असून प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गटविकास अधिकारी व संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत गावोगावी आंदोलन उभं राहण्याची शक्यता असून परिस्थिती चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे. “आता तरी जागे व्हा, नाहीतर जनता रस्त्यावर येईल” असा थेट इशारा ग्रामस्थांनी बुलडाणा कव्हरेज न्युज शी चर्चा करताना दिला आहे.
पाणी असून टंचाई असलेल गावे…
बोरगाव काकडे
देऊळगाव घुबे
तेल्हारा
खैरव
पेठ
अमडापूर
कव्हाळा या सह अनेक….














