मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील कोथळी येथून २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तरुणीला पळवून नेल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी बोराखेडी पोलिसांत दाखल केली असून, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोथळी येथील २२ वर्षीय तरुणी २५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेपासून ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी ४ वाजेच्या दरम्यान घरातून अचानक गायब झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला; मात्र ती आढळून आली नाही.
त्यानंतर कुटुंबीयांनी बोराखेडी पोलिसांत धाव घेत अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तरुणीला पळवून नेल्याची फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १४० (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार श्रीकांत चिटवार करीत आहेत. तरुणीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.














