Advertisement Advertisement

“चाबी दे” म्हणत घराबाहेर पडला, जेवायला फोन केला तर मोबाईल बंद! शेवटी घरच्यानं पोलीस ठाण्यात जाव लागल….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्थानिक मधुमालती नगर येथील ६४ वर्षीय गजानन गणपत खाडे हे घरातून निघून गेल्यानंतर परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सतिष गजानन खाडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, गजानन गणपत खाडे (वय ६४) हे १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घराची चाबी घेण्यासाठी म्हणून घरातून बाहेर पडले. त्यानंतर नेहमीप्रमाणे दुपारच्या जेवणासाठी त्यांना फोन केला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले.

कुटुंबीयांनी त्यांचा नातेवाईक तसेच इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेही शोध लागला नाही. त्यामुळे अखेर मलकापूर शहर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली.

या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिस ठाण्यात कायमी मिसिंग क्र. ५५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ सुनील राऊत करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!