मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी शिवण क्लाससाठी मोताळा येथे आली होती. क्लास संपल्यानंतर जुन्या मलकापूर रोडवरील क्लासेसमधून बाहेर पडताच एका अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तसेच मुलीचा शोध घेण्यासाठी पथकंही रवाना करण्यात आली आहेत










