Advertisement Advertisement

गॅस संपला, चुल पेटली..! चुलीच्या धुरावरून पेटला वाद; चौघांनी तरुणाला धुतला!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चुलीच्या धुराचा त्रास होत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना काळेगाव (ता. मलकापूर) येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय भावराव तायडे (वय २५, रा. काळेगाव) यांनी मलकापूर पोलिसांत तक्रार दिली. २८ मार्च रोजी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातील स्वयंपाकाचा गॅस संपल्याने त्यांनी घराजवळ चुल पेटवून स्वयंपाक सुरू केला होता.

दरम्यान, चुलीच्या धुराचा त्रास होत असल्याचे सांगत आरोपी विजय शंकर दाभाळे, अजय शंकर दाभाळे, अविनाश शंकर दाभाळे व सुनीता विजय दाभाळे (सर्व रा. काळेगाव) यांनी वाद घालत फिर्यादीस चापटांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत धारदार वस्तूने वार करून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यावेळी फिर्यादीच्या आई व पत्नीसही ढकलाढकली करून शिवीगाळ करण्यात आली तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी अप.क्र. १९४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोहेकॉ विक्रम राजपूत करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!