हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज): पेनटाकळी येथील विष्णू राजेकर (वय ३५) यांचा जलाशयात मृतदेह आढळून आल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी जलाशयात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू राजेकर यांनी मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता पेनटाकळी जलाशयात उडी घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच त्यांचा शोध सुरू करण्यात आला. बुधवारी सकाळी जलाशयात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मृतदेह जलाशयाबाहेर काढण्यात आला.
दरम्यान, राजेकर यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे पेनटाकळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विष्णू राजेकर यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.












