Advertisement Advertisement

कॉलेज प्रोजेक्टसाठी जाते सांगून घरातून निघालेली २२ वर्षीय युवती बेपत्ता! खामगाव ग्रामीण पोलिसांत नोंद…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील काळेगाव येथील २२ वर्षीय युवती कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, ती सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली असून ती बेपत्ता झाल्याची नोंद खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवती नेहमीप्रमाणे कॉलेजच्या प्रोजेक्टच्या कामासाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. ती घरी परत येईल, या अपेक्षेने सुरुवातीला कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने आणि तिचा कोणताही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली.

नातेवाईक व परिचितांकडे चौकशी करूनही तिचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेर कुटुंबीयांनी खामगाव ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची नोंद करून युवतीचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, संबंधित युवतीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!