क्लाससाठी गेलेली २० वर्षीय तरुणी बेपत्ता…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील सर्क्युलर रोडवरील चिंचोले चौक परिसरात असलेल्या एका शिकवणी वर्गात गेलेली २० वर्षीय तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील शिवशंकरनगर परिसरात राहणारी सलोनी सुरेंद्र वानखेडे (वय २० वर्षे) ही तरुणी चिंचोले चौकातील एका अकॅडमीमध्ये नियमित क्लाससाठी जात होती. दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता ती नेहमीप्रमाणे क्लासला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र, दुपारी १.३० वाजेपर्यंत ती घरी परतली नाही.

काळजीपोटी तिच्या आईने दुपारी २ वाजेच्या सुमारास सलोनीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचा मोबाईल बंद लागत होता. त्यानंतर संबंधित अकॅडमीमध्ये जाऊन चौकशी करण्यात आली. तसेच नातेवाईक, मित्र-मैत्रिणींकडेही शोध घेण्यात आला, मात्र ती कुठेही आढळून आली नाही.

शेवटी तरुणीच्या आईने बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!