Advertisement Advertisement

धक्कादायक…! प्रेम प्रकरणातून युवकाचा खून; मेहकर तालुक्यात खळबळ…

मेहकर/डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील खंडाळा एमआयडीसी परिसरात एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना ४ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


मृत युवकाचे नाव राहुल खुशालराव बाजड (वय अंदाजे २५-३०) असे असून तो मूळ मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील रहिवासी होता. सध्या तो वाशिम जिल्ह्यातील केनवड येथे “आपलं कलेक्शन” नावाचे कापड दुकान चालवत होता. मागील काही वर्षांपासून तो जाम आढाव येथे मामाच्या घरी वास्तव्यास होता. दरम्यान ३ मार्च रोजी अज्ञात व्यक्तीने त्याचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस ठाण्याचे ठाणेदार व्यंकटेश आलेवार, एपीआय संदीप बिरांजे, एपीआय जारवाल मॅडम तसेच पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.


प्राथमिक चर्चेनुसार हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!