Advertisement Advertisement

बुलढाण्यात पोस्ट ऑफिसला बॉम्बची धमकी; दुसऱ्यांदा आलेल्या ईमेलमुळे खळबळ, तपासात काहीही संशयास्पद…..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):बुलढाणा शहरातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, येथील मुख्य पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दुसऱ्यांदा ईमेलद्वारे प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे, राज्यातील सर्व पोस्ट ऑफिस व पासपोर्ट कार्यालयांनाही अशाच प्रकारचा मेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिला धमकीचा ईमेल ४ मार्च रोजी प्राप्त झाला होता, तर दुसरा ईमेल २५ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजता आला. या मेलमध्ये तब्बल १६ ठिकाणी स्फोट होणार असल्याचा गंभीर इशारा देण्यात आला होता, तसेच “तात्काळ सर्वांना बाहेर काढा” असेही नमूद करण्यात आले होते. या धमकीची गांभीर्याने दखल घेत पोस्ट प्रशासनाने तातडीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!