Advertisement Advertisement

भरधाव बोलेरोनं मोटारसायकलला उडवलं; मावशी ठार, भाचा गंभीर…

खामगाव:(बुलडाणा कव्हरेज न्युज)रामनगर शिवारात भरधाव बोलेरो पिकअपने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा भाचा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद लक्ष्मण इंगळे (वय ५०, रा. पिंपळे गुरव, पुणे) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. ५ मार्च रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रामनगर शिवारातील दगडू मानमोडे यांच्या शेतासमोरील मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. फिर्यादींची बहीण आणि भाचा मोटारसायकलने दवाखान्याकडे जात असताना भरधाव आलेल्या बोलेरो पिकअपने (क्रमांक MH 56 C 0014) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून भाचा गंभीर जखमी झाला आहे. तसेच दोन्ही वाहनांचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१)(२), २८१, १२५ (ब), ३२४ (४) व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. बाळकृष्ण फुंडकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!