Advertisement Advertisement

अखेर संदीप शेळके काँग्रेसच्या झेंड्याखाली; बुलढाण्याच्या राजकारणात नवा रंग…!”

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडत असून आता बुलढाण्यात “दादा पर्व” सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंटी दादा उर्फ हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते संदीप शेळके यांनी थोड्याच वेळापूर्वी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.

संदीप शेळके यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते. अखेर आज त्यांनी सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करत नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली.

शेळके यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी राजकारणात या निर्णयाचे परिणाम काय होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!