Advertisement Advertisement

घरच्यांना काहीच न सांगता १९ वर्षांची पोरगी घराबाहेर पडली; दिवसभर शोध घेऊनही ठावठिकाणा लागेना…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): नांदुरा तालुक्यातील धानोरा येथून १९ वर्षीय युवती घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती आढळून न आल्याने मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गा राजेंद्र धाडे (वय १९, रा. धानोरा, ता. नांदुरा) ही युवती ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली.

युवती घरी परतली नसल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरात तिचा शोध घेतला. मात्र सर्वत्र शोध घेऊनही ती कुठेही आढळून आली नाही. अखेर तिचे वडील राजेंद्र रायभान धाडे यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत मिसिंगची तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग क्रमांक १६/२०२६ अशी नोंद केली आहे. बेपत्ता युवतीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल पंकज वराडे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!