Advertisement Advertisement

मोठा अपघात..! चिखली जवळ बोरगाव वसु येथे बस-टिप्परची तुफान धडक; टिप्परचा पार चुराडा, चालक केबिनमध्येच अडकला! एक जण जागीच ठार….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली-खामगाव रोडवर बोरगाव वसू फाट्याजवळ बस अन् समोरून येणाऱ्या टिप्परची जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. धडक एवढी जोरात झाली की, एमएच २८ एबी ८२२८ क्रमांकाच्या टिप्परचा अक्षरशः चुराडा झाला. टिप्परचा पुढचा भाग मधोमध फाटल्यासारखा झाला असून केबिनची अवस्था पाहून अपघाताची भीषणता लक्षात येते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर-देऊळगाव राजा-जालना-चिखली-खामगाव-अकोला या मार्गावर धावणाऱ्या बसची टिप्परसोबत धडक झाली. या धडकेत टिप्परचा चालक चक्काचूर झालेल्या केबिनमध्ये अडकून पडल्याची माहिती आहे.

चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत चालक नेमका कोण, त्याची ओळख काय, तसेच बसमधील प्रवाशांपैकी कोणी जखमी झाले आहे का, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अपघाताची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. रस्त्यावर झालेल्या या भीषण अपघातामुळे काही काळ एकच गोंधळ उडाला. टिप्परची झालेली अवस्था पाहून उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः काटा आला.

दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा अधिकृत तपास सुरू असून पोलिसांच्या तपासानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे…..

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!