Advertisement Advertisement

मलकापूर पांग्राजवळ उभ्या आयशरला दुचाकीची जोरदार धडक; मोटारसायकल वरील दोन युवक…

मलकापूर पांग्रा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा ते मलकापूर पांग्रा मार्गावर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्यावर विरुद्ध दिशेने उभ्या असलेल्या आयशरला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने दोन युवक गंभीर जखमी झाले. यातील एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्दू उच्च प्राथमिक शाळेजवळ आयशर क्रमांक एमएच २८ बीबी ५६०४ रस्त्यावर विरुद्ध दिशेने उभा होता. दरम्यान, डोरव्ही येथे काही कामानिमित्त गेलेले आकाश तेजराव साळवे (वय २८) आणि त्यांच्यासोबत असलेले ताजीम नाझीम पठाण (वय १९) हे युनिकॉन दुचाकी क्रमांक एमएच २८ सीए २२४९ वरून मलकापूर पांग्राकडे परत येत होते.

शाळेजवळ आल्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या आयशरचा अंदाज न आल्याने त्यांच्या दुचाकीची आयशरला जोरदार धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी दोन्ही युवकांना तातडीने मलकापूर पांग्रा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघांनाही पुढील उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, या अपघातातील एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असून, अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!